Posts

Showing posts from June, 2014

स्वप्न कि सत्य!

काल रात्री अचानक वीज कडकडाट झाला, अगदी झोपमोड होईपर्यंत मोठा आवाज, मनात म्हटलं “राजेंची सटकली काय?” उठून बघते तर राजे झोपलेले मग हसले कोण म्हणून आजूबाजूला नजर टाकली तर एका कोपऱ्यात चित्रगुप्त उभे येऊ का म्हणून विचारात होते, थांबा जरा मीच येते नाही तर आपल्या आवाजाने राजे जागे होतील!” “हं.. बोला काय झाले इतक्या रात्री आलात, रात्रीचे २ वाजलेत तुम्हाला काही झोप वगैरे येते कि नाही?” मी सरळ चित्रगुप्तांना फैलावरच घेतले. “ Actully , एका चमत्काराबद्दल विचारायला आलो होतो.” इति चित्रगुप्त “कसला चमत्कार?” मी जरा वैतागतच विचारले एक तर झोपमोड झाली होती. “ज्याच्या मुळे ब्रम्हदेवाने मला show cause notice दिली, व स्वतः डोक्याला अमृतांजन चोळत बसले तो राज जैन एकदम दाढी करून वर चकचकीत कोट वगैरे घालून होता अशी बातमी नारदांनी दिली, म्हणून विचारायला आलो!” मी सरळ कप्पाळावर हात मारून घेतला आणि म्हटलं “काय मूर्खपणा आहे, ह्यासाठी झोप मोडायची काय गरज होती, FB वर मेसेज केला असता तरी मी उत्तर दिले असते!" “पण ब्रम्हदेवाने मला पर्सनली यायला सांगितले होते म्हणून आलो.” चित्रगुप्तांचे स्पष्टी

ज्ञानामृत आणि तेही साडीबद्दल

४ जानेवारी २०१४, सक्काळी सक्काळी नवऱ्याने आवाज दिला "तयार झालिस का? आज आपल्या मनराई आणि वृत्तबद्ध वृत्ती या पुस्तकांचे प्रकाशन आहे! काय करतेस किती वेळ? " "काय कुरकुर लावली आहे सक्काळी सक्काळी? मी तयार आहे ! तुमचीच अंघोळ होण्याची वाट बघते आहे!" इति आम्ही "झाली माझी अंघोळ! मला काय तुझ्यासारखा वेळ नाही लागत मेक अप करायला !" असे म्हणत बेडरूममध्ये राजे प्रकट झाले आणि "आपल्या पुस्तकांचे प्रकाशन आहे आणि तू अशी चुरगळलेली साडी नेसालीस?" हे वाक्य इतक्या जोरात होते कि आमची आईपण काय झाले म्हणून किचनमधून धावत आमच्या बेडरूममध्ये आली. "अरे ती चुरगळलेली नाहीये, Its crush.... " माझे उत्तर पूर्ण होण्याआधी आशा प्रकारची कोणतीही साडी नसते असे "ज्ञान" पाजळण्यास सुरुवात झाली. शेवटी कसेबसे समजावून आम्ही सासवडला रवाना झालो. तेव्हा ह्यावेळी Raj Nivedita ह्यांच्या साडीवरच्या अगाध "ज्ञानाला" स्मरून ह्यावेळी कोणतीही रिस्क न घेता सरळ सिल्क साडी सिलेक्ट केलेली आहे.!! ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη

आठवण

माझ्या आजीने मला (त्यावेळी ती मुंबईला राहत होती आणि आम्ही गावी म्हणजे उरणला) एक ताट दिले होते. आजी इतक्या लांबून माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली कित्ती आनंद झाला. मी त्याच दिवसापासून त्या ताटात जेवायला सुरवात केली ती लग्न होईपर्यंत कायम! पण जेव्हा माझ्या मैत्रिणीनी विचारलं कि आज्जी काय गिफ्ट घेऊन आली तेव्हा मी ताट दाखवलं तर त्यांची Reaction होती कि, “ताट? तुला आजीने ताट दिले, खेळणी, खाऊ किंवा कपडे अस काही द्यायचं सोडून ताट दिलं?” त्यांची बोलणी ऐकून मी थोडं खट्टू झाली होती पण माझ्यासाठी आजी गिफ्ट घेऊन आली हीच महत्वाची गोष्ट आहे. आणि तिची आठवण माझ्यासोबत असणं किती मोठी गोष्ट आहे हे मला ती गेल्यानंतर कळाल. माझ्याकडे मात्र तिने दिलेले स्टील चे ताट आहे. माझा वाढदिवस २४ मे ला असतो त्यावेळी मला ते ताट गिफ्ट केले, त्यामुळे माझा भाऊ लगेच तिला ताट गिफ्ट केले, मलापण हवे म्हणून भांडू लागला तेव्हा आजी त्याला म्हणाली तुझा वाढदिवस २७ जूनला आहे तेव्हा मी तुला देईन, पण १९ जूनला आजी देवाघरी गेली. आणि त्यानंतर जेव्हा माझ्या भावाचा वाढदिवस आला तेव्हा म्हणाला “आज्जी मला ताट गिफ्ट देणार होती आणि त्या आधीच देवाघर

१४ जून २०००

१४ जून २०००, घड्याळात ४ चे ४:३० झाले. आता माझा रिझल्ट कोण बघणार कारण त्यावेळी इंटरनेट वर निकाल जाहीर होत नव्हते आणि ज्याचा निकाल लागणार त्याला घराचे कधीच शाळेत पाठवत नसत कारण उगीच टेन्शन नको दुसरे कोणीतरी बघून यायचे, पण माझ्यासाठी कोण जाणार? शेवटी मीच तयार झाले. आजोबांना आवाज दिला “मी जाते आहे शाळेत निकाल घेऊन येते.” “तू जाशील ना? नीट जा काही होऊ दे किती मिळतील तेवढे मिळतील चिंता करू नकोस.” असे म्हणून मला पाठवले. मी अगदी झाशीच्या राणीच्या थाटात मी कोणाला घाबरत नाही (तस आजही मी कोणाला घाबरत नाही!) अशा अविर्भावात शाळेत दाखल झाले. पण आतून पुरती घाबरलेली होते कारण वर्गातील कोणीच दिसत नव्हते, कोणाचा भाऊ, बहिण, काका ई. लोक आले होते.  मी माझे हॉल तिकीट दाखवून रिझल्ट मागून घेतला. बघितला तर हुश्श! मी पास आले होते ५४% ने! घरी गेले. आजोबा माझी वाटच बघत बसले होते मला बघताच म्हणाले “आलीस! किती पडले?” ( नशीब मी पास होणार हे गृहीत धरले होते, नाहीतर माझ्या मोठ्या वाहिनिसारख नाही केले, नववीत असताना वाहिनीने प्रश्न केला होता “ताई, तुमचे किती विषय गेले? मी ऑन द स्पॉट आउट! पास कि नापास पण नाही