Posts

Showing posts from July, 2012

किल्ले वज्रगड आणि किल्ले पुरंदर : मीमकर-माबोकर मावळ्यांची एकत्रीत चढाई

Image
मागच्या आठवड्यात म्हणजे १ जुलै ला किल्ले पुरंदर व किल्ले वज्रगडला मीमराठी वर्षाविहार निमित्ताने भेट दिली त्याचा वृत्तांत श्री. विशाल कुलकर्णी यांनी मीमराठी वर टाकला होता त्यांच्या परवानगीने मी तो येथे देत आहे. वृत्तांत "हॅलो, कुठेयस बे?" "अरे नर्‍ह्यातच आहे, सॅंडविच घ्यायलो बे. ते मंदार आणि बाकीचे लोक पोचलेत तिथे. मी पण येतोच आहे दहा मिनीटात. समीर रानडे आणि त्याचा मित्र पिंगूबरोबर त्यांच्या गाडीने आधीच येवुन पोचलेत." "वंडर सिटीपाशीच ना?" "यस्स." आम्ही बाईकला किक मारली , गिअर टाकायच्या आधी मागे गृहमंत्री बसलेत ना हे बघून घेतलं. हो; नाहीतर परत " तुझा वेंधळेपणा कधी कमी होणार आहे कोण जाणे? " हे सुभाषित ऐकुन घ्यावं लागलं असतं. वंडर सिटीपाशी पोचलो तर तिथे एक छोटासा टँपो उभा होता, ते छोटा हत्ती का काय म्हणतात ना तसला. म्हणलं "च्यायला सम्याने, फोर्डची गाडी घेतली होती ती विकली काय?" पण आजुबाजुला कोणीच दिसेनात तेव्हा श्रीश्री रमतारामप्रभुंना फोन लावला. त्यांनी सांगितलं आम्ही इथे 'राज्याच्या' (श्रीमान राजेश