Posts

Showing posts from June, 2012

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ६

Image
मागील भाग १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात उल्लेखनीय असे नाव नसले तरी विसरता येणार नाही असे नाव म्हणजे अहिरीची राणी लक्ष्मीबाई. मध्य प्रांतातील सातपुडा व विंध्य पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यात राहाणार्‍या ह्या गोंडांचे सहकार्य हा सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक संस्मरणीय अध्याय आहे. मध्य प्रदेशातील चांदा जिल्ह्यात अहिरी येथे वास्तव्य करणार्याय राणी लक्ष्मीबाईचा इतिहास हा झांशी, अवध, रामगढ या प्रमाणे रक्तरंजीत नसला तरी त्याचे महत्व कमी होत नाही त्यांच्या या स्वातंत्र्याने प्रेरित झालेल्या जीवन पटावर प्रकाश टाकायलाच हवा. अहिरीची राणी लक्ष्मीबाई पूर्ववृत्तांत मध्य प्रदेशातील चांदा जिल्ह्यात अहिरी हि सर्वात मोठी जमीनदारी होती. तेथील जमीनदाराला राजा हा किताब दिला होता. मध्य प्रदेशातील सातपुडा व विंध्य पर्वतांच्या आसपास असल्यामुळे आपला निभाव त्या निबिड जंगलात लागणार नाही ह्याचा विचार करुनच ब्रिटिशांनी ते संस्थान हडप केले नाही परंतु त्यांच्याशी सलोख्याचे संबध ठेवले. याचा फायदा मात्र राणीने उठवला. आपली ताकद कमी पडेल हे जाणुन ती प्रत्यक्षात लढ्यात उतरली नसली तरी तीन