Posts

Showing posts from May, 2012

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ५

जवळ-जवळ ८ महिन्यांनी हा भाग टाकत आहे.  कृपया क्षमा असावी. भाग एक भाग दोन  भाग तीन  भाग चार  १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना आणखी एक नाव समोर येते ते म्हणजे रामगढची राणी अवंतीबाई लोधी. रामगढ हे मध्यप्रदेश मधील मांडला जिल्ह्यातील छोटे संस्थान होते. राजा विक्रमादित्य सिंहच्या मृत्युनंतर राणी अवंतीबाई लोधी ह्या राज्य कारभार चालवत होत्या. याचाच फायदा घेत Governor General Lord Dalhousie याने रामगढ संस्थान हड्प केले. यामुळे राणी अवंतीबाई पेटुन उठली. तिने १८५७ च्या लढ्यात उडी घेतली सुरवातीला आमनेसामने आणि नंतर गनिमी काव्याने लढलेली ही रणरागीणी आपल्यातच पडलेल्या फुटीमुळे जिंकु शकली नाही. त्या मुळे शत्रुच्या हातात पडण्यापेक्षा मरण चांगले म्हणुन स्वतःस तीने संपवले असले तरी तिची विरता कमी होत नाही. अशा या राणीच्या शौर्याची कहाणी. राणी अवंतीबाई लोधीचा पूर्ववृत्तांत रामगढ हे मध्यप्रदेश मधील मांडला जिल्ह्यातील छोटे संस्थान होते. तेथील राजे लक्ष्मण सिंह यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र राजकुमार विक्रमादित्य सिंह गादीवर बसले. ते अल्पायुषी ठरले व त्यांच्या पश्चात वारस नसल्