Posts

Showing posts from September, 2011

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - 4

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना झाशीच्या राणीच्या पाठोपाठ नाव घ्यावे असे नाव म्हणजे बेगम हजरत महल. १८५७ च्या संग्रामातील बेगम हसरत महल चे स्थान अद्वितीय होते. अवधचे विशाल   राज्य खालसा करून इंग्रजी अमलात समाविष्ट केले. हताश झालेल्या मुत्सद्दी व कारभारी यांनीही वनवास पत्करला. पण आपल्या बिर्जीस कादर नावाच्या अल्पवयीन बालकाला घेऊन बेगम हजरत महल हि लखनौतच राहिली होती शेवटी तिनेच आपल्या प्रचंड कर्तुत्वाने   अवधचा एवढा मोठा भाग स्वतंत्र झाला होता कि ईस्ट इंडिया कंपनीच्या खुद्द सरसेनापतीला चतुरंग दलासाहित तिच्याशी टक्कर द्यावी लागली होती. सतत २ वर्षे चालू असलेल्या ह्या युद्धात एकाहून एक धुरंधर इंग्रज सेनापती मारले गेले. अशा या बेगम च्या शौर्याची कहाणी बेगम हजरत महल चा पूर्ववृत्तांत १८४७ मध्ये वाजीद आली शहा हे अवध चे नबाब झाले. लखनऊ हि त्यांची राजधानी होती. एका साधारण गरीब घरात जन्म घेतलेली मोहम्मदी खातून ला बेगम हजरत महल हा किताब लग्नानंतर अवधचा बादशहा वाजीद आली शहा ने दिला इतकेच नव्हे तर इफ्तिख़ार उन निसा (स्त्री रत्न ) म्हणून गौरव हि केला.  सन १८०१ मध्ये वाज़िद अली शाहच्य