Posts

Showing posts from 2011

मराठेशाहीतील मनस्विनी

पुस्तक:  मराठेशाहीतील मनस्विनी लेखक:  डॉ. सु. र. देशपांडे प्रकाशक:  मेहता पब्लिशिंग हाउस  आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वावर जोरावर भरारी घेताना दिसतात. स्त्रीमुक्ती कडे वाटचाल करणारी, आजच्या म्हणजे आधुनिक काळातील स्त्री ही अधिक धीट, अधिक स्वतंत्र, अधिक व्यापक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणारी आहे. आजच्या स्त्रीचे हे धडाडीचे व्यक्तिमत्त्व आपण आज कौतुकाने स्वीकारतो. पण अशाच धडाडीच्या, शूर आणि कर्तुत्ववान स्त्रिया तीनशे – चारशे वर्षापूर्वी ही होत्या. कट्टर पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील या स्त्रिया प्रवाह विरुद्ध जाण्याची धडाडी ठेवत. इतिहास शिकण्याच्या निमित्ताने ह्या स्त्रियांचा परिचय आपल्याला झाला असला तरी त्यांचे मूळ जीवनचरित्र माहिती नसल्याने त्यांच्या विषयी निर्माण झालेले प्रवाद आणि त्यांच्या कामगिऱ्याच स्मरणात राहतात. राजघराण्यातील स्त्रिया म्हणजे नाजूक, परावलंबी असतात. महालापलीकडे त्यांचे जग नसते असा सर्वसाधारण गैरसमज असलेला दिसून येतो, पण मराठेशाहीतील काही स्त्रिया आपल्या वैध हक्कासाठी, कर्तव्यासाठी, मुलांसाठी, स्व

डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक

पुस्तक:  डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक लेखक:  अ‍ॅन फ्रँक, मंगला निगुडकर प्रकाशक:  मेहता प्रकाशन आज कितीतरी दिवसांनी मनाला भिडणारे पुस्तक वाचले. “ मंगला निगुडकर यांनी अनुवादित केलेले “डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक” हे पुस्तक मार्च १९८८ ला प्रथम प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्यक्षात हि डायरी “Het Achterhuis” १९४७ साली डच भाषेत तर १९५२ साली इंग्रजी भाषेत “अ‍ॅन फ्रँक – द डायरी ऑफ ए यंग गर्ल” या नावाने प्रकाशित झाले नंतर ते इतके गाजले कि, जवळ-जवळ प्रत्येक भाषेत त्याची भाषांतरे झाली आहेत. असे काय आहे ह्या डायरीत? असा तुम्हाला प्रश्न पडेल. मलाही पडला. पुस्तक वाचायला लागल्यावर अगदी मग्न झाले. अ‍ॅन फ्रँक हि हॉलंड मध्ये राहणारी १२ वर्षाची मुलगी होती. तिने आपल्या या डायरीचे नाव “किटी” ठेवले होते. १४ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ या २ वर्षाच्या काळात तिने डायरीमध्ये जे उतरवले आहे ते या पुस्तकात दिले आहे. त्यानंतर तिने डायरी लिहिणे बंद केले का ?? नाही! पण १ ऑगस्ट १९४४ रोजी तिने जे डायरीत लिहिले ते तिचे शेवटचे लिखाण होते. कारण ४ ऑगस्टला तिच्या संपूर्ण कुटुंबाला जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्या नाझी सै

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - 4

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना झाशीच्या राणीच्या पाठोपाठ नाव घ्यावे असे नाव म्हणजे बेगम हजरत महल. १८५७ च्या संग्रामातील बेगम हसरत महल चे स्थान अद्वितीय होते. अवधचे विशाल   राज्य खालसा करून इंग्रजी अमलात समाविष्ट केले. हताश झालेल्या मुत्सद्दी व कारभारी यांनीही वनवास पत्करला. पण आपल्या बिर्जीस कादर नावाच्या अल्पवयीन बालकाला घेऊन बेगम हजरत महल हि लखनौतच राहिली होती शेवटी तिनेच आपल्या प्रचंड कर्तुत्वाने   अवधचा एवढा मोठा भाग स्वतंत्र झाला होता कि ईस्ट इंडिया कंपनीच्या खुद्द सरसेनापतीला चतुरंग दलासाहित तिच्याशी टक्कर द्यावी लागली होती. सतत २ वर्षे चालू असलेल्या ह्या युद्धात एकाहून एक धुरंधर इंग्रज सेनापती मारले गेले. अशा या बेगम च्या शौर्याची कहाणी बेगम हजरत महल चा पूर्ववृत्तांत १८४७ मध्ये वाजीद आली शहा हे अवध चे नबाब झाले. लखनऊ हि त्यांची राजधानी होती. एका साधारण गरीब घरात जन्म घेतलेली मोहम्मदी खातून ला बेगम हजरत महल हा किताब लग्नानंतर अवधचा बादशहा वाजीद आली शहा ने दिला इतकेच नव्हे तर इफ्तिख़ार उन निसा (स्त्री रत्न ) म्हणून गौरव हि केला.  सन १८०१ मध्ये वाज़िद अली शाहच्य

माझा गुरु

             आयुष्यातला प्रत्येक क्षण काही ना काही शिकवत असतोच जीवनात अनेक गुरु येतात, प्रत्येकाची शिकविण्याची पध्दत वेगळी असते पण आयुष्यभर संस्कारांवर मोहोर उमटवते ती पहिल्या गुरुची शिकवणी!!! हि पोस्ट माझ्या पहिल्या गुरूसाठी आज ज्यांच्यामुळे मी आज लिहायाला शिकली (म्हणजे मी काही मोठी लेखिका नाही पण जे काही लिहिते ते.... असो ) लोक म्हणतात कि पहिली गुरु म्हणजे आई असते पण मी गर्वाने सांगते माझे पहिले गुरु म्हणजे माझे दादा (वडील). ( माझी आई हि पण माझी उत्तम मार्गदर्शक आहे पण... पहिल्या गुरूचा मन दादानांच)                   माझं वक्तृत्व आणि माझं लेखन ज्यांनी घडवले ते दादा घडवलेच म्हणावे लागेल (मी घरात शेंडेफळ त्यामुळे फार आळशी आणि झोपेचा छंद तेव्हापासून जडलेला आजही कायम आहे.... असो.) आमच्या गुरूंना म्हणजेच दादांना वक्तृत्वाची देणगी आजोबामुळे लाभलेली पण त्यामुळे त्यांचे वाचन खूप आणि अभ्यासही, लहानपणी खूप बक्षिसे मिळविली होती त्यांनी. आमचे थोरले बंधू आजी – आजोबांकडे मुंबईला शिकण्यास होते, आणि मी आई – दादांसोबत गावाकडे त्यामुळे वक्तृत्वाचे प्रयोग आमच्यावर झाले.                    पण त्या प्

मोरपीस

                 नातं म्हणजे मनाच्या पुस्तकात जपलेलं मोरपीसच असतं ना! आपलं मन किती हळवं असत?? काही वेळा आपलंच मन आपलं राहत नाही आणि त्याची समजूत घालणे फार कठीण होऊन बसता.... तेव्हा त्याला समजून घेणाऱ्या.. त्याचा आधार बनणाऱ्या..त्याला प्रेरणा आणि बळ देणाऱ्या विश्वात ते रमत तिथे असतं एक नातं... भावनिक बंधांची गुंफण असणारं.. आपल्या भावनांना जपणारं.. मायेची उब देणार, जाणीवांना समजून आधार देणार अशा नात्याची जवळीक फार थोड्या लोकांना लाभते. मनातल्या भावना अन् नात्याचे नवीन अंकुर त्यांचा गुंता कसाही असला तरी हवाहवासा वाटतोच ना!! एका मित्राने चॅट स्टेटस लावून ठेवलं होतं “एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे.” किती खर आहे हे वाक्य!!               कारण कधी कधी एखादी व्यक्ती खूप जवळची, आपलीच वाटू लागते. तिचे विचार म्हणजे आपल्याच हृदयातील भावनांचे प्रतिबिंब वाटू लागते. ती व्यक्ती म्हणजे सर्वस्व. अशा वेळी तिथे जन्म घेतं ते एक नाजूक नातं. या नात्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त महत्व अस

नमन नटवरा!!!!!!!!!!!

Image
                ‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कलेची जाण असणा-या मातीमध्ये बालगंधर्व नावाचे रोपटे तरारले आणि नंतरची ५०-६० वर्षे हा गायनाचा, अभिनयाचा कल्पवृक्ष सतत बहरत राहिला. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण बालगंधर्व या नावाची जादू काही ओसरली नाही. संगीत नाटकाचा सुनहरा जमाना संपला तरीही महाराष्ट्राने बालगंधर्वांना दूर लोटले नाही. पल्लेदार नाट्यगीते गाणारा हा आवाज पुढे भक्तिगीते आणि अभंग गाऊ लागला. वृद्धत्व आले, अपंगत्व आले तरीही महाराष्ट्र्राचे या व्यक्तिमत्त्वावरचे प्रेम काही कमी झाले नाही. बालगंधर्वांनीहि महाराष्ट्राला भरभरून दिले.                 लोकमान्य टिळकांचा तो सुवर्णकाळ होता. त्यांनीच नारायण राजहंस या सुरिल्या गळ्याच्या मुलाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली. लोकमान्य टिळक यांनी गायकवाड वाड्यातील गणेशोत्सवामध्ये छोट्या नारायण राजहंसाचे गाणे ऐकले. खरे तर हे गायन चालू असताना लोकमान्य ‘केसरी’ च्या अग्रलेखाचे लेखन करीत होते. पण नारायणाच्या आवाजाची, आलापाची जादू अशी

कहानी चंद्रकांता कि !!!!

Image
आज सकाळी TV वर चॅनेल सर्फ करत असताना अचानक सहारा वन वर कार्यक्रम बघितला  कहानी चंद्रकांता कि !!!! आणि मनात विचार आला आयला चंद्रकांता परत चालू झाली?? १९९४ ते १९९६ च्या दरम्यात दूरदर्शन वर चालणारी दर रविवारी लागणारी सिरीयल मी आणि माझा भाऊ न चुकता बघणारे. कालांतराने हि सिरीयल दूरदर्शन वरून बंद होऊन सोनी तव वर आली . आपण हि सहारा वन वर चालू झालेली हि नवीन चंद्रकांता डेली सोप सारखी कहानी पुढे नेलेली निघाली. आता मात्र हद्द झाली म्हणत मी आपला  चॅनेल बदलला. शेवटी काहीच नाही म्हणून गाणी ऐकत बसली. पण मन मात्र मागच्या आठवणींमध्ये अडकून बसला ह्या चंद्रकांता मधला सर्वात लक्षात राहिलेलं पात्र  म्हणजे अखिलेंद्र मिश्र यांनी साकारलेला  "क्रूर सिंग" आणि त्याची ती "याक्कू" म्हणण्याची पद्दत. ते आठवण आली आणि अचानक कंटाळेल्या चेहऱ्यावर हसू फुटलं. त्यानंतर लगेच आठवला तो भाऊ आणि त्याच्या उद्योगामुळे त्याला आम्ही क्रूर सिंग नाव ठेवला होता.  क्रूर सिंग त्याच्या दोन चेल्यांसह  झालं असा होता हि भावाच्या केसात झाला होता कोंडा आणि ह्या पट्ठ्याला वाचनाची फार आवड. त्याचमुळे  त्याच्या  वाचनात आल

चिकन बिर्याणी आणि उपोषण

माझ्या जन्माच्या आधी घडलेली घटना आहे. माझ्या दादांनी सांगितलेली हि उपोषण कथा आहे. खरे तर रामदेव बाबांचे उपोषण चिरडले त्यावेळी हा किस्सा त्यांनी सांगितला होता. पण कामाच्या व्यस्ततेमुळे लिहावयास जमले नाही. म्हणून आज पोस्ट टाकते आहे.  १९७० च्या आसपास उरणमधील एक पुढारी उपोषणास बसले, १,२,३, असे करत ४ था दिवस उजाडला नेहमी प्रमाणे डॉक्टर येऊन आले उपोषणकर्त्याचे ब्लडप्रेशर तसेच इतर चेकअप करण्यात आले सगळे नॉर्मल, एखाद्याला असते सवय म्हणून डॉक्टरांनी जास्त चर्चा न करता आपला रिपोर्ट वर पाठवला. ५ व्या दिवशी जिल्हाधिकारी पहाणी करण्यास आले असता त्यांनी कोणतीही चर्चा न करता, आश्वासन न देता सरळ त्यांच्या सगळ्या मागण्या तत्काळ मान्य केल्या. कारण जिल्हाधिकारी आले तेव्हा उपोषणकर्त्याची चौकशी करतानाच अचानक व्यासपीठाच्या खाली प्रचंड मोठे असे कुत्र्यांचे खेखाट झाले. ते बघण्यासाठी खाली वाकले असता चिकन च्या हाडांसाठी कुत्र्यांचे भांडण चालू होते त्यामुळे सगळे भांडे फुटले.  प्रत्यक्षात उपोषणकर्त्यावर नजर ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस शिपायाला पैसे देऊन पटवण्यात आले होते. दिवसभर पाणी हि न पिणारे हे रात्री मस्त

गच्च भरला पाऊस

Image
धूसर प्रकाश,  वाटा अंधारल्या  गच्च भरला पाऊस,  दिशा मोहरल्या  माझ्या बेडरूम च्या खिडकीतून ढगांनी गच्च भरलेल आकाश  घरच्या बाल्कनी मधून टिपलेले आभाळ  बेडरूम च्या खिडकीतून टिपलेला देवळाचा कळस  पावसात खेळायला आलेली अध्यांतरी  ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

पोटोबा !!!!!!!!!!

Image
शनिवार नेहमीप्रमाणे डब्बा नाही म्हणून मग काय McD जिंदाबाद Medium Fries , Mcspicy with tomato sauce ani coke :)   ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

TIMEPASS

Image
काल संध्याकाळी ऑफिस मधून लवकर सुटका झाली. वाशी डेपो ऑफिस पासून ५ मिनिटे अंतरावर असल्याने चालत निघाले डेपो जाऊन बह्गते तर काय बस  स्टॉप माणसांच्या गर्दीत फुलून वाहत होता. स्वताशीच म्हटलं ह्या परिस्थिती आपल्याला काय बस मिळणार नाही, तेव्हा पुढच्या स्टॉप वर प्रस्थान करावे तो हि पुढे ५ मिनिटाच्या अंतरावर म्हटल्यावर मग चालत मार्गक्रमण केले तर तिकडे  संध्यकाळी मार्केटच भरले होते. तेव्हा त्या गर्दीत जमेल तसे वाट आणि फोटो काढत मार्गक्रमण केले. पण त्या गोंधळत एक बस गेली असो त्याचे दुख नाही करण लगेच आणि कधी नव्हे तर १० मिनिटात दुसरी बस आली ती हि रिकामी त्यामुळे पुढचा प्रवास सुखकर झाला असो. त्या मार्केट ची क्षणचित्रे ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐