Posts

Showing posts from August, 2010

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !!

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा    मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा ||  असे म्हणत कोळी लोकांचा जमाव, सजवलेला नारळ घेऊन हसत खेळत समुद्राच्या रोखाने जात असतो आणि समुद्राची पूजा करून तो नारळ त्याला अर्पण केला जातो ती दिवस म्हणजे श्रावण शु. पोर्णिमा यालाच नारळी पोर्णिमा म्हणतात. आषाढ महिन्यात व श्रावणाच्या पूर्व भागात पावसाचा जोर फार असतो. पावसाचा देव ' वरुण' याला शांत करण्यासाठी सागराला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. कोळी लोकांचे जीवन समुद्रावर अवलंबून असते त्यामुळे ते दर्याराजा शांत होण्याची ते वाट बघत असतात. श्रावण पौर्णिमेला दर्याराजाला नारळ अर्पण करून त्या नंतर कोळी लोक मासेमारीसाठी दर्यात जहाज हाकारतात.                           प्राचीन काळी भारतीय लोक व्यापार आणि धर्मप्रसार या साठी जलमार्गाने परदेशी जात असत. त्यांचे सुयश आणि जीवन या रत्नाकरावर अवलंबून असे म्हणून समुद्राचे पूजन व श्रीफळ दान विधी करून समुद्र शांत होण्यासाठी ते प्रार्थना करीत. तो सामुदाईक समारंभ याच श्रावण शुद्ध पौर्णिमेस करण्याची प्रथा पडली. याच दिवसापासून पाऊस संकटांचा जोर कमी होऊन त्या लोकांचा समुद्र