Posts

Showing posts from July, 2010

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - २

१८५७ चा भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा पहिला ब्रिटीश विरोधी संग्राम होता. आता त्या संग्रामाला १५३ वर्षे लोटली. १५ ऑगस्ट २०१० ला भारतीय स्वातंत्र्याला ६३ वर्षे पूर्ण होतील.  या भारतीय स्वातंत्र्याला स्त्रियांनीच चेतना दिली होती. हा इतिहास सर्वश्रुत नाही. या युद्धात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रिया म्हणून झाशीची रणी लक्ष्मीबाई, अवधाची  बेगम हसरतमहल व दिल्लीच्या  सम्राट बहादूरशहाची बेगम झीनतमहल यांचीच नवे सामन्यात: ज्ञात आहेत. त्यांचे कर्तुत्व थोर आहेच, पण अशा आणखीही कितीतरी महिला भारताच्या सर्वच विभागात त्याकाळी चमकून गेल्या. कानपूरची कलावंतीण अझीजन, तुळसापूर  व रामगड येथील राण्या, अहिरीची जमीनदारीण लक्ष्मीबाई, ग्वाल्हेरची बायजाबाई शिंदे, कोल्हापूरची ताईबाई, नागपूरची बाकाबाई भोसले, नरगुंद येथील राजमाता यमुनाबाई  आणि राजपत्नी सावित्रीबाई, मोतीबाई, मुंदर, सुंदर, झलकारी, काशी, ललिता बक्षी हि झाशीच्या वीरांगना खाणीतील नारीरात्ने आदी महिलांची नामावली लहान नाही. या सर्व महिलांनी स्वातंत्र्य संग्रामाचे मांगल्य पूर्णपणे ओळखले होते व म्हणूनच त्यात आपणहून उडी घेण्यात त्यांना कोणत्याही प्रकारची दिक्क

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - १

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात राणी लक्ष्मीबाईसह अनेक रणरागीणींनी आपल्या प्राणाची बाजी लावली. अशा या  रणरागीणींचा इतिहास सांगणारी हि लेखमालिका मी ब्लोग वर प्रसिद्ध  करत आहे.  १८५७ चे समर हे भारतीय स्वातंत्र्याचे युद्ध नव्हते तर ते केवळ शिपायांचे बंड होते असे मतलबी व स्वार्थी इंग्रज लेखकांनी लिहून ठेवले आणि भारत जोवर गुलाम होतं तोपर्यंत अनेक हिंदी लेखकांनीही त्यांचीच री ओढली हे सर्वाना ठावूक आहे. पण १९५७ साली या स्वातंत्र्य समराची शताब्दी साजरी करण्यात आली आणि पारतंत्र्याची शृंखला तोडणारा; आपले हिरावले गेलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी भारतीयांनी केलेला तो एक महान  स्वातंत्र्य- संग्राम होता यावर आपल्या शासनानेही शिक्कामोर्तब केले.  या स्वातंत्र्य युद्धात स्त्रियांनी जे कर्तुत्व गाजविले त्याची खूप माहिती उपलब्ध झाली असली तरी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, अवधची बेगम हसरतमहल आणि दिल्लीच्या समर्थ बहादूरशहाची बेगम झीनतमहल यांची नवे तर अग्रणी आहेत. पण ज्यांची नामावली इतिहासात प्रसिद्ध नाही अश्या कितीतरी स्त्रिया १८५७ च्या रणांगणावर प्रत्यक्ष उतरल्या होत्या.  १८५७ चा संग्राम हा १० मे १

महाराष्ट्राची अस्मिता - वारली चित्रकला

Image
महाराष्ट्र हे अनेक गुणांनी समृद्ध असे राज्य आहे. इथे महाभारतातील पुरातन वस्तूपासून ते तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली, छत्रपती शिवाजी महाराज, ब्रिटीशांचे राज्य यांच्या गाथा, कथा योग्य जपून ठेवल्या आहेत. तसेच सांस्कृतिक व कलाक्षेत्रातसुद्धा महाराष्ट्र मागे नाही. अभंग, पोवाडा, भारुड, नमन, गोंधळ असे अनेक वेगवेगळ्या लोककला अजूनही प्रसिद्ध व जपून ठेवल्या आहेत. गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ठाणे जिल्हा आहे. येथे "वारली" म्हणून आदिवासी राहतात. त्यांच्याकडे चित्रकलेची एक वेगळी परंपरा त्यांनी अजूनही जपून ठेवली आहे. आज मुंबई व सुरात हि दोन प्रगत शहरे जवळ असल्यामुळे व या दोन शहरांच्या "cosmopolitan" होण्याने "वारली paintings " ना पुन्हा चांगले दिवस आले आहेत.  चित्रकलेचा इतिहास                                     वारली चित्रकला हि साधारण १० व्या शतकात सुरु झाली असावी. त्यावेळी अक्षर नसल्यामुळे चित्रांद्वारे आपले विचार त्यावेळची लोक मांडत असावी. पण नंतरच्या  काळात हि कला लुप्त होऊन पुन्हा १७ व्या शतकात सुरु झाली. पण अशीच चित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका गुफां